Chhagan Bhujbal | Mangal Prabhat Lodha
Chhagan Bhujbal | Mangal Prabhat LodhaTeam Lokshahi

मंत्री लोढांच्या विधानाचा छगन भुजबळांनी घेतला समाचार; म्हणाले, इतिहास माहिती नसेल...

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर करता पण एकनाथ शिंदे हे मंत्रीच होते, त्यांच्याविरोधात इथे कोण मोघल होते
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. एक वाद शांत होत नाही तर दुसरा उफाळून येतो. आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता आज भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी देखील वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनातील एका प्रसंगाची तुलना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे. या विधानामुळे प्रचंड वाद निर्माण झाला आहे. त्यावरच आता अनेक राजकीय लोकांची प्रतिक्रिया येत असताना त्यावरूनच राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर निशाणा साधला आहे.

Chhagan Bhujbal | Mangal Prabhat Lodha
वाचाळवीरांना आवरा, मंत्री लोढांच्या वादग्रस्त विधानावर अजित पवारांचा शिंदे- फडणवीसांना सल्ला

काय म्हणाले छगन भुजबळ?

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विधानावर बोलताना भुजबळ म्हणाले की, जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहिती नसेल, तर तुम्ही त्यांची तुलना कशाला करता, आणि बोलताच का, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना मिर्झाराजे यांना घेऊन गेले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्याला राजासारखी वागणूक मिळत नाही असं ज्यावेळी वाटलं होतं, त्यावेळी शिवाजी महाराज यांनी त्यांचा बोलून अपमान केला. अपमान झाला म्हणून त्यांना अटक झाली असल्याचं देखील भुजबळांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, तरीही छत्रपती शिवाजी महाराज मोघलांच्या तावडीतून बाहेर पडले. आणि या गोष्टीची तुलना तुम्ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर करता पण एकनाथ शिंदे हे मंत्रीच होते, त्यांच्याविरोधात इथे कोण मोघल होते, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

Chhagan Bhujbal | Mangal Prabhat Lodha
न्यायालयाचा नवाब मालिकांना धक्का, जामीन अर्ज फेटाळला

काय म्हणाले होते मंगलप्रभात लोढा?

शिवप्रताप दिनी आज प्रतापगडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषणादरम्यान मंगल प्रभात लोढा म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना डांबून ठेवले होते. पण, ते स्वराज्यासाठी बाहेर पडले. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवले होते. पण, महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असे त्यांनी म्हंटले आहे. मंगलप्रभात लोढांच्या या वक्तव्यावरूनआता राजकीय वर्तुळात त्यांच्या पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com