Pankaja Munde Dhananjay Munde
Pankaja Munde Dhananjay Mundeteam lokshahi

पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाले, देशाच्या सर्वोत्तम नेत्याच्या बाबतीत...

त्या पक्षात नाराज आहेत, धनंजय मुंडेंचा सवाल
Published by :
Sagar Pradhan

राज्यात एकीकडे राजकीय घडामोडी सुरु असताना, काल भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी एक खळबळजनक विधान केलं होत. पंकजा मुंडे यांच्या त्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. त्यावरच आता राष्ट्रवादी नेते धंनजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Pankaja Munde Dhananjay Munde
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांवर बंधनकारक, पण या निर्णयाचा आदर राखला जाईल का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

माध्यमांशी बोलत असताना धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडेंच्या वक्तव्याबद्दल विचारणा केली असता त्यावर ते बोलताना म्हणाले की, कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ते जर त्यांच्याच पक्षाच्या देशाच्या सर्वोत्तम नेत्याच्या बाबतीत असं बोलत असतील तर मी काय बोलावं, असा टोला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला.

Pankaja Munde Dhananjay Munde
बापाची जहागिरदारी असल्याप्रमाणे वागले, पडळकरांची जयंत पाटलांवर विखारी टीका

पुढे ते म्हणाले की, मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये याबाबतीत काय झालं, काय नाही झालं जनता काय करु शकते हे माहिती आहे. पंकजा मुंडे यांनी ते वक्तव्य का केलं आपण त्यांना विचारावं. नरेंद्र मोदी यांच्याबाबत वक्तव्य का केलं, हे त्याच सांगू शकतील. त्या पक्षात नाराज आहेत की नाही त्याचं सांगतील, अशी प्रतिक्रिया यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com