Jitendra Awhad Team Lokshahi
राजकारण
बाजूला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा, आव्हाडांचे ट्विट
रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच औरंगजेबाविषयी एक विधान केले. आव्हाडांच्या य विधानामुळे राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. भाजपकडून आव्हाडांवर जोरदार टीका देखील केली जात आहे. मात्र, या वादादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एक ट्विट केले आहे. त्यांचे हे ट्विट आता चांगलंच चर्चेत आलं आहे.
काय आहे आव्हाडांचे ट्विट?
''रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्ण अर्जुन समजावून सांगा. बाजूला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा.'' 'आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा', असे ते या ट्विटमध्ये म्हणाले. आव्हाडांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.