NCP
NCPTeam Lokshahi

सुप्रीम कोर्टाचा निकालावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया; आयोग्य योग्य निर्णय घेईल

राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आणि अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया
Published by :
Sagar Pradhan

राज्यात अभूतपूर्व गोंधळ घडत असताना, आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरेंची याचिका फेटाळली असून शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. तब्बल सहा तास चाललेल्या सुनावणीनंतर कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे. यामुळे खरी शिवसेना कोणाची व पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. यावरच आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

NCP
ठाकरेंना धक्का तर शिंदेंना 'सुप्रीम' दिलासा! निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती नाही

आजच्या निर्णयावर बोलताना राष्ट्रवादी नेते जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यानंतर हा निणर्य आता आयोगाकडे कोर्टाने सोपवला आहे. दोन्ही पक्षाची बाजू ऐकून निवडणूक आयोग निर्णय घेईल अशीच अपेक्षा आहे. हा कोर्टाचा निर्णय नाहीय, कोर्टाने निवडणूक आयोगाकडे समोर जाऊन तिथे सगळी प्रोसेस करण्याचे सांगतिले आहे. यावेळी कोर्ट दुसरी सुनावणी चालू ठेवलं आणि निवडणूक आयोग देखील प्रक्रिया चालू ठेवलं, निवडणूक आयोग्य स्वतंत्र आहे, आम्हाला विश्वास आहे. कोणाच्याही दबावात न येता, आयोग्य योग्य निर्णय घेईल हीच अपेक्षा. अशी प्रतिक्रिया यावेळी पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

NCP
पक्षाचं चिन्ह काही आमदारांची संपत्ती नाही; शिंदे गटाच्या वकीलांचा युक्तीवाद

अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया

शिंदे गटातील प्रत्येक आमदारांना विश्वास असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. सुप्रीम कोर्टाने हा चेंडू आयोगाच्या कडे ढकलला आहे. हा यावर अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. आता निवडणुक आयोगाकडे हा निर्णय गेला आहे. त्यामुळे चिन्ह मिळणार ही शिंदे गटाची भाबळी अशा आहे. त्यामुळे या निर्णयावर शिंदे गटातील आमदारांनी हुरळून जाऊ नये. असे विधान अमोल मिटकरी यांनी बोलताना केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com