Jitendra Awhad
Jitendra Awhad Team Lokshahi

'उद्यापासून तुमची आणि माझी पर्सनल लढाई' जितेंद्र आव्हाडांची आयुक्तांसोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल

जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारवाई करायला. असे मला पाटील यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्यासोबतच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. या संभाषणांमध्ये त्यांनी पालिका आयुक्त सुबोध ठाणेकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यात कळव्यात 29 बेकायदा बांधकामे सुरू असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. बांधकामे उभी करण्यासाठी तुम्ही पैस घेता आणि पाडताना माझे नाव लोकांना सांगता. असे जितेंद्र आव्हाड संभाषण क्लिपमध्ये बोलताना दिसत आहे.

जितेंद्र आव्हाड आणि आयुक्त ठाणेकर यांचे संभाषण

जितेंद्र आव्हाड : रोहितदास पाटीलला काय सांगितलं की मी, जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारवाई करायला. असे मला पाटील यांनी सांगितले आहे.

सुबोध ठाणेकर : नाही सर.

जितेंद्र आव्हाड : रोहिदास पाटील यांच्या बिल्डिंगच्या बाजूला तुम्हाला इतर अनधिकृत बिल्डिंग दिसल्या नाही का?

सुबोध ठाणेकर : हो, सर त्यांच्यावर पण केली कारवाई.

जितेंद्र आव्हाड : आता काय करणार तुम्ही.

सुबोध ठाणेकर : नाही सर पहिले तेच टार्गेट केलंय. नवीन बांधकाम सुरूच करू द्यायचं नाही.

जितेंद्र आव्हाड : ते ठिक आहे. पण, जे झालंय ग्राऊंड प्लस सेव्हन त्याला बघू पण नका. म्हणजे ते पूर्ण पैसे कमवतील.

सुबोध ठाणेकर : नाही तसं नाही आहे.

जितेंद्र आव्हाड : तुम्ही रोहिदास पाटील यांच्याकडून २० लाख रुपये घेतले.

सुबोध ठाणेकर : हे काहीही आरोप करताय.

जितेंद्र आव्हाड : देणाऱ्या माणसाला उभा करू का समोर. तुम्ही कुणाच्या हातून पैसे घेतले. माहीत आहे का तुम्हाला. काय येड समजता का लोकांना. चौकशी लागली तर धूर निघेल धूर. सर्वात बदनाम होतील ती तुमची पोरं.

सुबोध ठाणेकर : हो सर.

जितेंद्र आव्हाड : येस सर, येस सर करू नका. रोहित पाटलाला फोन करा. मी तुमच्याकडे पुरावा घेऊन येईन ज्या माणसानं २० लाख रुपये दिले त्याला. उद्यापासून तुमची आणि माझी पर्सनल लढाई सुरू. फोन ठेवा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com