Rohit Pawar
Rohit PawarTeam Lokshahi

शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का? रोहित पवारांचा सवाल

गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी मराठा चेहरा असावा यासाठी गद्दारी केली, असे वक्तव्य केले.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच वेगवेगळ्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली असताना त्यातच दुसरीकडे एकापाठोपाठ एक गौप्यस्फोटाचे सत्र सुरु आहे. त्यातच जळगावमधील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी मराठा चेहरा असावा यासाठी गद्दारी केली, असे वक्तव्य केले. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Rohit Pawar
औरंगाबाद अन् उस्मानाबाद नामांतरानंतर पडळकरांनी केली अहमदनगरच्या नामतंराची मागणी

काय म्हणाले रोहित पवार?

आज नाशिकमध्ये महाराष्ट्र व्हिजन फोरमच्या माध्यमातून रोहित पवार यांनी युवकांशी संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ज्यावेळी अनेक गोष्टी हाताबाहेर जातात, त्यावेळी अशी वक्तव्ये केली जातात. एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का? या गोष्टी अयोग्य आहे. सर्व समाजासाठी एकत्रित धोरण ठरविणे गरजेचे असते. इतर समाजाचे देखील प्रलंबित प्रश्न आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या विधानावर दिली.

काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?

जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्यावर सारखी गद्दार गद्दार म्हणून टीका केली जाते. गुलाबराव पाटील गद्दार झाले, अशी टीका आमच्यावर आमचे विरोधक करतात. पण, गुलाबराव पाटील गद्दार नाही झाले. एक मराठा चेहरा (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) आमच्या शिवसेनेतून बाहेर जात होता, त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, काय म्हणणं आहे तुमचं? असे ते यावेळी म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com