Sunil Shelke
Sunil ShelkeTeam Lokshahi

'राष्ट्रवादी पक्षातील विजयी उमेदवाराला उमेदवारी' आमदार सुनील शेळकेंचे विधान

राष्ट्रवादीचा उमेदवार उद्या सकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. चिंचवडची उमेदवारी राष्ट्रवादीला मिळावी, अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठीकडे केली आहे.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच नुकताच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता कसबा व चिंचवड या दोन जागेंसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली. या निवडणुकीवरून आता राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. उमेदवारीवरून सध्या प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसची पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव येथे बैठक पार पडली. याच बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी चिंचवड पोटनिवडणुक उमेदवाराबाबत माध्यमांशी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे.

Sunil Shelke
आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष चपळगावकरांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

काय म्हणाले शेळके?

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची धुरा सांभाळणारे आमदार सुनील शेळके यांनी अप्रत्यक्षरित्या भाष्य करत राहुल कलाटे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचा उमेदवार उद्या सकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. चिंचवडची उमेदवारी राष्ट्रवादीला मिळावी, अशी अपेक्षा पक्ष श्रेष्ठीकडे केली आहे. बाहेरचा उमेदवार असला तरी महाविकास आघाडी म्हणून उमेदवारी मागत असल्याने त्यावर पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील. राष्ट्रवादी पक्षातील विजयी उमेदवाराला उमेदवारी मिळेल. असे सूचक विधान त्यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले की, कुठलीही गटबाजी किंवा वशिलेबाजी करून उमेदवारी दिली जाणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com