ncp
ncp Team Lokshahi

शरद पवारांचे विचार आणि राष्ट्रवादी कोणी संपवू शकत नाही,रोहित पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार..

90% राष्ट्रवादी ही भाजपात विसर्जित होईल, पडळकरांच्या टीकेला रोहित पाटलांचे उत्तर

संजय देसाई,सांगली: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर राष्ट्रवादीची युवा नेते रोहित पाटलांनी जोरदार पलटवार केला आहे, असा कोणताही पक्ष आणि संघटना संपत नसते,आणि आपला जन्मच राष्ट्रवादीच्या स्थापने बरोबर झालाय, त्यामुळे आपण तरी राष्ट्रवादी शिवाय कोठे जाऊ शकत नसल्याचं स्पष्ट करत पडळकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपात विलनीकरणाच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

ncp
राणेंच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंची सडकून टीका; म्हणाले, पदाचा फूल फॉर्म सांगावा

तसेच महाराष्ट्राच्या नवनिर्मिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि शरद पवारांचा मोठा हात आहे आणि नवनिर्मिती करणाऱ्या शरद पवारांच्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे,महाराष्ट्राचा विकास कोणी केला याची कल्पना सर्वांनाच आहे,शेतकऱ्यांना देखील आहे,पवार साहेबांचे विचार आणि पक्ष कोणीच संपू शकत नाही त्यामुळे असं पक्ष संपणार नाही,असा टोलाही रोहित आर.आर.पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे.

काय म्हणाले होते पडळकर?

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय कार्यालय व बारामतीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल आणि 90% राष्ट्रवादी ही भाजपात विसर्जित होईल, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केला आहे,यावरून रोहित आर आर पाटलांनी बोलताना हा पलटवार केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com