'शिंदे-फडणवीसांनी महाराष्ट्र झुकवला, निवडणूक गुजरातला अन् सुट्टी महाराष्ट्राला'

'शिंदे-फडणवीसांनी महाराष्ट्र झुकवला, निवडणूक गुजरातला अन् सुट्टी महाराष्ट्राला'

गुजरात निवडणुकीसाठी आता केवळ काहीच दिवस शिल्लक असून सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातीलही बडे नेते गुजरातमध्ये प्रचारासाठी दाखल झाले आहेत.

मुंबई : गुजरात निवडणुकीसाठी आता केवळ काहीच दिवस शिल्लक असून सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातीलही बडे नेते गुजरातमध्ये प्रचारासाठी दाखल झाले आहेत. तर शिंदे-फडणवीस सरकारने गुजरात निवडणुकीच्या मतदानासाठी चार जिल्ह्यांमधील मतदारांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे. पार्श्वभूमीवर आता विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.

'शिंदे-फडणवीसांनी महाराष्ट्र झुकवला, निवडणूक गुजरातला अन् सुट्टी महाराष्ट्राला'
'सत्तापिपासूपणाचा खेळ सुरू असतानाच न्या. चंद्रचूड सर्वोच्च पदावर येणे हा ईश्वरी संकेत'

पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे गुजरातच्या सीमेला लागून आहेत. गुजरातमधील अनेक नागरिक महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने आलेले आहेत. यामुळे त्यांना त्यांना मतदान करता यावे यासाठी दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आहे. याबाबतचे राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी म्हंटले की, महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नव्हता. पण, शिंदे-फडणविसांनी गुजरात समोर झुकवला. निवडणूक गुजरातला आणि सुट्टी महाराष्ट्राला, अशी टीका त्यांनी केली आहे.

तर, शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. या आठवड्यात मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक गुजरात राज्याच्या निवडणुकीमुळे होणार नाही. गुजरातसाठी राज्यातील अजून काय काय बंद किंवा रद्द होणार आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये एकूण 182 जागांसाठी दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होणार आहे. या विधानसभा निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबरला लागणार आहे. गुजरातमध्ये 2017 च्या निवडणुकीत भाजपच्या जागांची संख्या प्रथमच दुहेरी आकड्यांपर्यंत कमी झाली होती. या विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला 77 जागा जिंकण्यात यश आले. गेल्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली मानली जात होती. यातच कॉंग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रातून थेट गुजरात निवडणुकीच्या प्रचाराला गेले आहेत.

'शिंदे-फडणवीसांनी महाराष्ट्र झुकवला, निवडणूक गुजरातला अन् सुट्टी महाराष्ट्राला'
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com