'राज्यात वडील पळवायची शर्यत, आताच रेकॉर्ड करा शरद पवार माझेच वडील'
पुणे : सध्या वडील पळवायची शर्यत राज्यात सुरू आहे. त्याच्यामुळे मी ती जागा आता कोणाला देणार नाही. टीव्ही कॅमेरे चालू आहेत. त्यामुळे रेकॉर्ड करून ठेवा कारण ते माझेच वडील आहेत, असा खोचक टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. सासवड येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच, कुणाला त्यांच्या विचारांचा वारसा घ्यायचा असेल, त्यावेळी ते तुमचे माझ्यापेक्षा जास्त आहेत. याबाबत मी काही क्लेम करणार नाही, अशीही मिश्कील टीका सुळेंनी केली आहे.
प्रतिष्ठा हा शब्द मला फार गमतीशीर वाटतो. पवार कुटुंबाची प्रतिष्ठा काटेवाडी गावामध्ये. जर निवडणूक आम्ही जिंकली की आमची प्रतिष्ठा वाढेल किंवा आमची निवडणूक हरली की आमची प्रतिष्ठा संपली. इतक्या हलक्या दर्जाची प्रतिष्ठा आमची नाही, अशी अप्रत्यक्ष टीका सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केली आहे.
महाराष्ट्रात एक नवीन मोर्चाची पद्धत निघाली आहे. आणि ते मोर्चे असे सांगतात. तुम्ही लग्न कोणाशी करायचं. तुम्ही काय खायचं आणि धर्माबद्दलची माहिती ती तुमच्यापर्यंत पोहचवतात. आणि मोठं मोठे पोस्टर लावायचे आणि त्यावर एक दिवस धर्मासाठी असे लिहायचे. ही आपली संस्कृती नाही. एक दिवस धर्मासाठी हा एक विरोधाभास नाही का? आपले संस्कार काय सांगतात. हरीचे नाव क्षणभर घे, एवढंच पुरेसे आहे.
इंटर कास्ट मॅरेज म्हणजे काय? लव्ह जिहाद चा अर्थ काय? लव्हचा अर्थ मला माहित आहे. जिहादचा अर्थ मला माहीत आहे. मात्र, लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही ऑक्सफोर्डच्या डिक्शनरमध्ये नाही. जर कोणाकडे तर त्यांनी मला समजवा मी चर्चेला बसायला तयार आहे. त्यामुळे माझे अस म्हणणे आहे की चर्चा आणि संवाद झाला पाहिजे. जरी त्यांची मते वेगळी असतील तरी आमची संवाद करण्याची तयारी आहे.
आज अनेकजण वेगवेगळ्या विषयांवर बोलले. मात्र, मी आज वेगळ्या मुद्द्यावर बोलणार आहे. अनेक घटना टीव्हीवर दाखवल्या जातात. मात्र एक घटना कोणीही दाखवली नाही. कपल नावाच्या पत्रकाराला दोन वर्षासाठी UAPA जेलमध्ये टाकले. यामध्ये कपलची चूक काय? ते केवळ बातमी करण्यासाठी केरळहून उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका मुलीवर बलात्कार झाला होता त्याची बातमी आणि माहिती काढण्यासाठी शोध पत्रकारिता करण्यासाठी ते गेले होते. किंवा जाण्याचा प्रयत्न करत होते. ना ते केस करत होते किंवा ते काही स्टेटमेंट करत होते. ते संविधानिक चौकटीत राहून बातमी करत होते. त्यामुळे त्यांना आधीच अटक केली. आणि UAPA कायद्याअंतर्गत त्यांना दोन वर्षासाठी जेलमध्ये टाकले. आणि आज त्यांच्या विरोधात पुरावे नसल्याने त्याची आज सुटका करण्यात आली. याला नेमके काय म्हणावे. दडपशाही का हुकूमशाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
मी महिला खासदार नाही. मी फक्त खासदार आहे. यात स्त्री पुरुष याचा विचार केला जात नाही. एखादा राष्ट्रीय पक्ष जर कोणी कोणाशी लग्न करावे, कोणत्या पद्धतीने करावे याच्यात जर लुडबुड करत असेल तर, या गोष्टीला मी विरोध करणार आहे. मुलींना जगायचा अधिकार आहे. मोकळा श्वास घ्यायचा अधिकार आहे. यावर कोणत्या पक्षाने दबाव आणू नये. एखाद्या सिनेमावर विनाकारण वादळ निर्माण करायचे, हे मी पाहिले आहे. ज्या पद्धतीने सिनेमा असतील त्या पद्धतीने समाजाने पाहिले पाहिजे.
आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मी लोकसभेत एक क्रमांकाने आले. जेवढी बुद्धीमत्ता असेल तेवढेच मार्क पडतील. असे पवार साहेबांनी मला सांगितले. मात्र, ज्यावेळी लोकसभेत जेव्हा मी पहिल्या क्रमांकावर आले. त्यावेळी साहेब म्हणाले की मुलगी कोणाची आहे, असा किस्साही सुप्रिया सुळे यांनी सांगितला.