shinde-fadnavis government
shinde-fadnavis government Team Lokshahi

माझं काय होईल...; व्यंगचित्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर राष्ट्रवादीचा निशाणा

व्यंगचित्र काढत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या अंधश्रध्देवर बोट ठेवले.

मीशा म्हात्रे | मुंबई : 'माझं काय होईल' ... 'यांचं भविष्य माझ्या हाती' अशा आशयाचे व्यंगचित्र काढत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या अंधश्रध्देवर बोट ठेवले आहे.

नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 'हात' दाखवायला ज्योतिषाकडे गेल्याचे माध्यमातून समजले. त्याच गोष्टीचा धागा पकडत क्लाईड क्रास्टो यांनी ज्योतिषाकडे नाही तर फडणवीसांच्या हातात तुमचे भविष्य आहे, असे सूचवले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 'माझं काय होईल' असे फडणवीस यांना हात दाखवत विचारत आहेत आणि देवेंद्र फडणवीस 'यांचं भविष्य माझ्या हाती' असे बोलत असल्याचे हे व्यंगचित्र क्लाईड क्रास्टो यांनी काढत एकनाथ शिंदे यांना एकप्रकारे तुमचं सरकार अंधश्रध्देवर किती काळ टिकणार हे सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे

Lokshahi Marathi
www.lokshahi.com