MPSC चे नवीन नियम 2025 पासून लागू होणार; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

MPSC चे नवीन नियम 2025 पासून लागू होणार; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मागणी मान्य झाल्यावर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष साजरा केला

पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून परिक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्यात यावा, या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून सकाळपासून पुण्यात आंदोलन करण्यात येत होते. यावर शिंदे-फडणवीस सराकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष साजरा केला आहे.

MPSC चे नवीन नियम 2025 पासून लागू होणार; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
आत्महत्या नको, आता हत्या करायला शिक; सदाभाऊ खोत यांचा विद्यार्थ्यांना धक्कादायक सल्ला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यावर्षीपासून म्हणजे 2023 पासून यूपीएससीच्या धर्तीवर नवीन पॅटर्ननुसार परिक्षा घेण्याच ठरवण्यात आले होते. या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध करत आज सकाळपासूनच पुण्यात आंदोलन करत होते. या आंदोलनात विद्यार्थ्यांसोबतच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार आणि माजी आमदार सदाभाऊ खोतही सहभागी झाले आहेत.

याबाबत कॅबिनेट मीटिंगमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचा आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. परंतु, जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली.

मुख्यमंत्र्यांकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती मिळत आहे. 2025 पासून नवीन पॅटर्ननुसार परिक्षा घेण्याची विनंती राज्य सरकारतर्फे एमपीएससीला करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com