अध्यक्ष नसलेला पक्ष; निलेश राणेंनी राष्ट्रवादीची उडवली खिल्ली, ठाकरेंवरही प्रहार

अध्यक्ष नसलेला पक्ष; निलेश राणेंनी राष्ट्रवादीची उडवली खिल्ली, ठाकरेंवरही प्रहार

शरद पवारांच्या निवृत्तीवरून भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी व ठाकरेंवर प्रहार केला आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. राज्यभरातून या निर्णयाविरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले असून शरद पवारांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अशातच, शरद पवारांच्या निवृत्तीवरून भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी व ठाकरेंवर प्रहार केला आहे.

अध्यक्ष नसलेला पक्ष; निलेश राणेंनी राष्ट्रवादीची उडवली खिल्ली, ठाकरेंवरही प्रहार
शरद पवारानंतर अध्यक्षपदी अजित पवार योग्य; कोण म्हणाले असं?

शरद पवारांच्या निवृत्तीवरून भाजप नेते निलेश राणे यांनी उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीवर खोचक टीका केली आहे. अध्यक्ष नसलेला पक्ष म्हणून राष्ट्रवादीची त्यांनी खिल्ली उडवली. तर, पक्ष नसलेला अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. निलेश राणे यांनी अध्यक्ष नसलेला पक्ष : राष्ट्रवादी, पक्ष नसलेला अध्यक्ष : उद्धव ठाकरे, अशा निशाणा ट्विटरवरुन साधला आहे.

तर, नारायण राणे यांनी शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. माननीय शरद पवार साहेब, आपण राजकारणातही हवेत आण‍ि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या अध्‍यक्षपदी सुध्‍दा हवेत, असे नारायण राणे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या निर्णयाविरोधात कार्यकर्ते दुपारपासून उपोषणावर बसले होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अखेर निवृत्तीच्या निर्णयावर दोन ते तीन दिवसात अंतिम विचार करणार असल्याचा निरोप शरद पवारांनी अजित पवारांकरवी पाठवला आहे. तसेच, राज्यातील राजीनामा सत्र ताबडतोब थांबवावे, असे आवाहनीही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शरद पवारांनी केले असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com