निलेश राणेंना इन्फ्लुएंझा व्हायरसची लागण; केले 'हे' आवाहन

निलेश राणेंना इन्फ्लुएंझा व्हायरसची लागण; केले 'हे' आवाहन

भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांना इन्फ्लुएंझा व्हायरसची लागण झाली आहे. ही माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली
Published on

मुंबई : भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांना इन्फ्लुएंझा व्हायरसची लागण झाली आहे. ही माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली. यासोबतच सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन निलेश राणेंनी ट्विटर अकाउंटद्वारे केले आहे. तसेच, या व्हायरसरची लक्षणे आणि आपल्या प्रकृतीचे अपडेटही त्यांनी सांगितले आहेत.

निलेश राणेंना इन्फ्लुएंझा व्हायरसची लागण; केले 'हे' आवाहन
MLA disqualification : ठाकरे गटाकडून नवी याचिका दाखल

निलेश राणे म्हणाले की, १० तारखेला अचानक ताप भरला आणि हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर रिपोर्टमध्ये इन्फ्लुएंझा व्हायरस डिटेक्ट झाला. हा व्हायरस आणि होणारा त्रास हा फुफ्फुसावर हल्ला करतो. ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होते. ताप येण्याअगोदर कसलेही लक्षण नाही, काही क्षणात ताप भरतो, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

तर, आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यामंनी केले आहे. खाजगी आयुष्यातलं मी कधीच ट्विट करत नसतो पण आपल्याला सगळ्यांना अगोदर माहिती असावं म्हणून सांगितलं. नेमकं कशामुळे हे इन्फेक्शन झालं हे अद्याप कळू शकलं नाही, असेही निलेश राणेंनी सांगितले.

दरम्यान, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार इन्फ्लुएंझा व्हायरलमध्ये ताप, खोकला, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, तीव्र अस्वस्थता, घसा खवखवणे आणि नाक वाहणे ही लक्षणे दिसतात. ही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला जातो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com