संजय राऊत लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार; नितेश राणेंचा दावा

संजय राऊत लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार; नितेश राणेंचा दावा

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचे संकेत भाजप नेते नितेश राणे यांनी दिले आहेत.

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचे संकेत भाजप नेते नितेश राणे यांनी दिले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा राणेंनी केला आहे. तसेच, संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशासाठी शुभेच्छा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच, उध्दव ठाकरे यांच्यावरही नितेश राणे यांनी टीकास्त्र डागले.

संजय राऊत लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार; नितेश राणेंचा दावा
लोकांना धर्मकारणात धुंद करून नशेबाज करायचे आणि...संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मुंबईच्या वज्रमूठ सभेच्या अगोदर मी तेव्हाच सांगितलं होतं. बीकेसीमध्ये होणारी सभा महाविकास आघाडीची शेवटची सभा आहे. लोकांना माझ्यावर विश्वास नाही मला हलक्यात घेतले. पण, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केलं की पुढच्या सभा रद्द झालेल्या आहेत. मी बोललो ते खरं झाले, असे नितेश राणे यांनी म्हंटले आहे. तर, संजय राऊत अजित पवार यांच्यावर टीका करत आलेत. अजित पवार यांच्याविरोधात एकमेव संजय राऊत बोलत आहेत. अजित पवार यांनी पक्ष सोडला तर संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करेल, असा मोठा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

सगळ्या नेते मंडळांनी पवार साहेबांना विनंती केली राजीनामा देऊ नका. मग, अशात उद्धव ठाकरे यांनी एकही फोन किंवा याबाबत विचारणा केली नाही किंवा रश्मी ठाकरे यांनीही केली नाही. मग, हे काय षडयंत्र आहे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. अशी माहिती होती की उद्धव ठाकरे शरद पवार यांना भेटायला जाणार होते. परंतु, ते गेले नाहीत किंबहूना संजय राऊत यांनी भेट घेऊ दिली नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

कर्नाटकमध्ये संजय राऊत भाषणं करायला गेले होते. तिथं संजय राऊत काँग्रेसची दलाली करण्याचं काम करतं आहे. तिथं महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार उभे आहेत. तिथं काँग्रेस उमेदवार त्यांच्या विरोधात आहेत आणि तरीदेखील संजय राऊत काँग्रेसची दलाली करत आहे, अशी टीकाही नितेश राणेंनी केली आहे.

राज्याचा सर्वात मोठा दलाल बारसूला गेला होता. यांना आता कातळशिल्प तुम्हाला दिसलं. त्यावेळी पत्र का दिलं? त्यावेळी कातळशिल्प दिसलं नाही का? त्यावेळी गद्दारांनी मला चुकीची माहिती दिली आणि त्यामुळे मी पत्र दिलं. त्यावेळी शिंदे आणि त्याचे आमदार ओरडून सांगत होते की महाविकास आघाडी तोडा मात्र त्यावेळी त्यांनी ऐकलं नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com