कोण संजय राऊत? पवारांच्या विधानावर राऊतांची पहिली प्रतिक्रिया; मविआला तडे...

कोण संजय राऊत? पवारांच्या विधानावर राऊतांची पहिली प्रतिक्रिया; मविआला तडे...

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात वाकयुध्द रंगली आहे.

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात वाकयुध्द रंगली आहे. अजित पवारांना एक प्रश्न विचारला असता त्यावर कोण संजय राऊत? असं उत्तर त्यांनी दिलं आहे. यावर संजय राऊत यांनी पहिला प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार स्वीट डिश, गोड माणूस आहे. पवार कुटुंबातल्या कोणत्याही घटकाशी माझा कधी वाद नव्हता, असे त्यांनी म्हंटले आहे.

कोण संजय राऊत? पवारांच्या विधानावर राऊतांची पहिली प्रतिक्रिया; मविआला तडे...
महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार; आंबेडकरांनंतर राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा

मी इतर पक्षांसंदर्भात कधीही मत व्यक्त करत नाही. जोपर्यंत महाविकास आघाडीला तडे जात नाहीत. माझा संबंध महाविकास आघाडी म्हणून सगळ्या घटक पक्षांच्या समन्वयाचा आहे. त्यामुळे अंतर्गत पक्ष कोणीही असेल मी बोलेन, असे संजय राऊत म्हणाले.

आम्ही परवा एकत्र जेवलो, त्यांना देखील माहीत आहे, एकच टेबल वर बसून जेवलो, मस्त जेवलो, अजित पवार स्वीट डिश आहेत, गोड माणूस आहे, त्यांना रागवू द्या, माणसाने मन मोकळे केले पाहिजे.

पवार कुटुंबातल्या कोणत्याही घटकाशी माझा कधी वाद नव्हता. अजित पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख स्तंभ आणि नेते आहेत. भारतीय जनता पक्ष जर लावालावी करत असेल तर त्यांना सांगतो त्यांचा डाव कधीही यशस्वी होणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, खारघर येथील कार्यक्रमात काय झाले यासंदर्भात आम्ही बोलतो, तिथे 50 लोकांचे मृत्यू झाले. अजित दादा म्हणतात न्यायालयीन चौकशी व्हायला व्हावी मात्र त्याबरोबरच नाना पटोले म्हणतात त्याप्रमाणे विधानसभेचे अधिवेशन देखील घ्यायला हवे, असे मत संजय राऊत यांनी मांडले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com