Nitesh Rane : बिल्ली म्याव म्याव करने चली अयोध्या

Nitesh Rane : बिल्ली म्याव म्याव करने चली अयोध्या

अयोध्या दौऱ्यावरुन नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज अयोध्या दौरा करणार आहेत. यासाठी अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. याचा आढावा घेण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सोमवारपासून अयोध्येत तळ ठोकून आहेत. यावरुन आता भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

Nitesh Rane : बिल्ली म्याव म्याव करने चली अयोध्या
चलो अयोध्या! आदित्य ठाकरेंचा आज दौरा

नितेश राणे म्हणाले की, सौ पाप करके बिल्ली म्याव म्याव करने अयोध्या चली, अशा शब्दात नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही ट्विटरवरुन आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे. आज एक जुनी गोष्ट आठवली जेंव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती. तेव्हा पोटनिवडणुकीत आज अयोध्येत असलेले सगळे शिवसेनेचे नेते शेपूट घालून बसले होते. काही जण तर घरी बसून लॉलीपॉपचा आस्वाद घेत असतील. फक्त राजसाहेबच तिथे प्रचार करत होते. सेटिंग करून दौरा आणि हिम्मत असणं यातला फरक आहे, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.

Nitesh Rane : बिल्ली म्याव म्याव करने चली अयोध्या
संसदेचे पावसाळी अधिवेशन 'या' तारखेपासून होणार सुरु

दरम्यान, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचं मात्र अयोध्येत स्वागत केलं जाणार आहे. तर आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे हनुमान गढीचं दर्शन घेणार असून प्रभू श्री रामाचं दर्शन करणार आहेत. संध्याकाळी 6.45 वाजता शरयू नदीच्या घाटावर आरती करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com