Nitesh Rane : नितीन देसाईंना धमकी मातोश्रीच्या जवळच्या माणसाकडून

Nitesh Rane : नितीन देसाईंना धमकी मातोश्रीच्या जवळच्या माणसाकडून

नितीन देसाई मृत्यू प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नितीन देसाई मृत्यू प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. आर्थिक विवंचनेमुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती समोर आली आहे. यावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.

नितेश राणे माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी नितीन देसाईंना मदत का केली नाही? त्यांचा स्टुडिओ विकत द्यावा आणि तो आम्हाला द्या असा कुणाचा दबाव होता?

मातोश्रीच्या जवळचा माणूस नितीन देसाईंना धमक्या देत होता. जो ठाकरे सिनेमा आला त्याचे शूटिंग एन डी स्टुडिओत झालं त्याचे पैसे दिलेत का? देसाईंचा एन.डी.स्टुडिओ उद्धव आणि रश्मी ठाकरेंना हवा होता, त्यासाठी मातोश्रीच्या जवळचा माणूस नितीन देसाईंना धमक्या देत होता, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com