नितीन गडकरींनी कॉंग्रेसमध्ये यावे, आम्ही पाठींबा देऊ; नाना पटोलेंची ऑफर

नितीन गडकरींनी कॉंग्रेसमध्ये यावे, आम्ही पाठींबा देऊ; नाना पटोलेंची ऑफर

मागील काही दिवसांपासून नितीन गडकरी भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा
Published on

अकोला : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसमध्ये यावे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, अशी ऑफर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून नितीन गडकरी भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी ऑफर दिली असून लवकरच गडकरींची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ते अकोला येथे पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्रात काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मोठी ऑफर दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, नितीन गडकरी भाजपमध्ये नाराज असून तेथील परिस्थिती चांगली नाही. आम्ही त्यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण देतो. ते आमच्यासोबत येतात. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. लवकरच गडकरींची भेट घेणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

ते म्हणाले, काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष आहे. यामध्ये कोणत्याही पदाधिकाऱ्याला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण, भाजपमध्ये तसे नाही. अलीकडे नितीन गडकरी यांची पक्षात ज्या प्रकारे अवस्था झाली आहे, ते योग्य म्हणता येणार नाही.

नितीन गडकरी पक्षावर नाराज आहेत. मी त्यांना आमंत्रित करतो. त्यांनी आमच्यात सहभागी व्हावे. आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तयार आहोत. केंद्र सरकारविरोधात बोलणाऱ्यावर ईडी-सीबीआय लादण्याची पद्धत आपल्याकडे नाही. असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात. आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी गडकरींना ओखळले जातात. यामुळेच तीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनाही भाजपच्या समितीतून वगळण्यात आले आहे. यानंतर नितीन गडकारी भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. मात्र आता एखाद्या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरोधातच सीबीआयचा वापर होऊ नये अशी शंका काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी उपस्थित केली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com