इतिहासाचे पुनर्लेखन करणार : अमित शहा

इतिहासाचे पुनर्लेखन करणार : अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इतिहासकारांना भारतीय संदर्भात इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आवाहन केले आहे आणि त्यांना सरकार पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासनही दिले आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इतिहासकारांना भारतीय संदर्भात इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आवाहन केले आहे आणि त्यांना सरकार पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासनही दिले आहे. आसाम सरकारने दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अमित शाह बोलत होते. आमचा इतिहास योग्य आणि गौरवशाली पद्धतीने मांडण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही, असा सवाल त्यांनी सर्वांना केला आहे.

इतिहासाचे पुनर्लेखन करणार : अमित शहा
मी राज्यपालांना जवळून ओळखते, त्यांच्या विधानाचा...; अमृता फडणवीसांकडून पाठराखण

अमित शहा म्हणाले, मी इतिहासाचा विद्यार्थी आहे आणि बर्‍याचदा असे ऐकले आहे की आपला इतिहास नीट मांडला गेला नाही आणि त्याचा विपर्यास केला गेला आहे. कदाचित ते खरे असेल. पण, आता आपल्याला ते दुरुस्त करावं लागेल. मी येथे उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यापीठातील प्राध्यापकांना विनंती करतो की, आपल्या इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे ही गोष्ट आपण लोकांच्या मनातून काढून टाकली पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या 300 व्यक्तिमत्त्वांवर संशोधन व्हायला हवे.

जेव्हा आम्ही पुरेसे लिहू, तेव्हा इतिहास चुकीचा शिकवला जात आहे ही कल्पना नाहीशी होईल. केंद्र त्यांच्या संशोधनाला पूर्ण सहकार्य करेल. पुढे या, संशोधन करा आणि इतिहासाचे पुनर्लेखन करा. अशा प्रकारे आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देऊ शकतो. लोकांच्या हितासाठी इतिहास पुन्हा समजून घेण्याची आणि त्याची उजळणी करण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.

इतिहासाचे पुनर्लेखन करणार : अमित शहा
...म्हणून मला अटक करण्यात आली; संजय राऊतांनी सांगितले कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यांच्यातील अंतर भरून काढले आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे ईशान्य भारतात शांतता प्रस्थापित झाली आहे, असेही अमित शहा यांनी म्हंटले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com