Naba DasTeam Lokshahi
राजकारण
ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन
आज दुपारी 12:30 च्या सुमारास त्यांच्यावर पोलिस अधिकाऱ्यानं गोळीबार केला होता.
ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा किशोर दास यांच्यावर आज जीवघेणा हल्ला झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यातच मोठी बातमीसमोर आली आहे. हल्ला झाल्यानंतर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. याच उपचारादरम्यान आता त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे ओडिशा राज्यात एकच खळबळ माजली आहे.
60 वर्षीय दास हे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गांधी चौकात आपल्या कारमधून उतरत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल दासने त्याच्यावर पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळीबार केला होता. झारसुगुडा जिल्ह्यातील ब्रजराजनगर भागात आज दुपारी 12.30 वाजता ही घटना घडली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यातच आता सुमारे 7 ते 8 तासानंतर निधन झाल्याचे वृत्तसमोर आले आहे.