'या' दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच सिंधुदुर्गात

येत्या ४ डिसेंबर २०२३ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच सिंधुदुर्गात येत आहेत.
Published by  :
Siddhi Naringrekar

येत्या ४ डिसेंबर २०२३ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच सिंधुदुर्गात येत आहेत. नौदल स्थापना दिनानिमित्त मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर भव्य असा कार्यक्रम होणार असून यावेळी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मुख्य उपस्थिती असेल.

या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून तारकर्ली किनारी भव्य असे स्टेज उभारले जात आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत या स्टेजचे काम पूर्ण होईल. तसेच राजकोट या भुईकोट किल्ल्यावर सुद्धा जय्यत तयारी सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com