रऊफ मेमनसोबतच्या व्हिडीओवर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, कोणाच्या कपाळावर लिहिलं नाही की...

रऊफ मेमनसोबतच्या व्हिडीओवर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, कोणाच्या कपाळावर लिहिलं नाही की...

किशारी पेडणेकर यांच्यावर रऊफ मेमनसोबतचा व्हिडीओवरुन विरोधकांचे टीकास्त्र

मुंबई : राज्यात दहशतवादी याकूब मेमनची कबरीचे सुशोभिकरण केल्यावरुन नवे वादंग उभे राहीले आहे. अशातच, शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावरुन विरोधकांनी पेडणेकरांवर टीकास्त्र डागले आहे. याला किशोरी पेडणेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सगळे भेटतात. कोणाच्या कपाळावर लिहिलेलं नाही की त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मी गेले हे खरे आहे. नीट पहा त्यात मी तर आहे. पण, ज्यांनी तक्रार दिली त्या आहेत आणि भाजपचे आकाश पुरोहित सुद्धा आहेत. महापौर म्हणून कोविड काळात मंदिर, मस्जिद, गुरुद्वारामध्ये भेट दिली होती. तिथल्या पदाधिकाऱ्यांना भेटले आणि अडचणी ऐकून घेतल्या आहेत. ते 50-60 लोक होते. सगळे भेटतात. कोणाच्या कपाळावर लिहिलेलं नाही की त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत मेमनचे फोटो किशोरी पेडणेकर यांनी दाखविला व त्या पुढे म्हणाल्या, आता मी एक फोटो दाखवते. यावर उत्तर द्या. मी यावर आक्षेप घेत नाही मात्र, मला घेरणार असाल तर या फोटोंना उत्तर द्या, असा निशाणा त्यांनी भाजपवर साधला आहे.

एका स्त्रीवर आक्षेप घेता सत्ता मिळवा. पण, काम करून मिळवा. शिवसेनेने अनेक वर्षे सत्ता मिळवली आहे, हे सांगताना पेडणेकर भावनिक झाल्या होत्या.

तर, मोहित कंबोज यांच्यावर किशोरी पेडेणेकर यांनी चांगलीच आगपखड केली आहे. कंबोज तू असशील पैसेवाला ते घरात फालतूगिरी बंद कर. मोहित कंबोज यांची राजकीय आणि इतर पार्श्वभूमी सगळ्यांनाच माहिती आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

Lokshahi
www.lokshahi.com