विरोधी पक्षाची आज महाबैठक; मात्र शरद पवार, ममता बॅनर्जी..
आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीला देशभरातील 24 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच बंगळुरू येथे विरोधकांची दोन दिवस बैठक चालणार आहे. . महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलली आहेत. शरद पवार यांच्या पक्षातच फूट पडल्याने या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आज कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांना खास डिनरही देण्यात येणार आहे. मात्र या बैठकीला आज शरद पवार आणि ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाही आहेत. ममता बॅनर्जी यांच्या गुडघ्याची मायक्रोसर्जरी झाली आहे. त्यामुळे त्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी हजर राहणार आहेत.
तसेच शरद पवार मुंबईत पक्षाच्या आमदारांना भेटणार आहेत. त्यामुळे ते देखिल बैठकीच्या दुसऱ्या दिवशी हजर असणार आहेत. या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल हे सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार आहेत.