Tunisha Sharma | Ram kadam
Tunisha Sharma | Ram kadam Team Lokshahi

लव्ह जिहादचा अँगल समोर आला तर त्यादृष्टीने देखील सखोल चौकशी होईल- राम कदम

तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा कथित प्रियकर शिझान खान याला काल अटकर करण्यात आली होती.
Published by :
Sagar Pradhan

काल अभिनेत्री तुनिषा शर्माने वसई येथे चित्रीकरण सुरु असलेल्या सेटवरच आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. छोट्या पडद्यावर कमी कालावधीत यश संपादन करणाऱ्या या तरुण अभिनेत्रीच्या आयुष्यात असं काय झालं की तिला आयुष्य संपवावं लागलं, यावर प्रचंड चर्चा होत आहे. यानंतर तिचा कथित प्रियकर शिझान खान याला काल अटकर करण्यात आली होती. त्यावरच आता भाजपचे आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Tunisha Sharma | Ram kadam
शिंदेंच्या मनात उठावाचे बीज मीच पेरले; राऊतांची शिंदे गटावर जोरदार टीका

इंडिया टुडेशी बोलत असताना राम कदम यांनी या प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करतील असे मत व्यक्त केले. तसेच चौकशीत लव्ह जिहादचा अँगल समोर आला तर त्यादृष्टीने देखील सखोल चौकशी होईल, असे ते म्हणाले. लव्ह जिहादच्या मागे कोणती संघटना आहे का? त्यांचे काय षडयंत्र आहे? याचाही तपास पोलिस करतील आणि तुनिषाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील, असे राम कदम यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com