Rishi Sunak | PM Modi
Rishi Sunak | PM Modi Team Lokshahi

पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल पाकिस्तान वंशाच्या खासदाराचे विधान; यूकेच्या पंतप्रधान सुनक यांनी टोचले कान

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधित या डॉक्युमेंटरीमध्ये मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत त्याच्याशी मी त्यांच्याशी अजिबात सहमत नाही.
Published by :
Sagar Pradhan

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटेनचे पंतप्रधान यांच्यातील जवळीकता किती जास्त आहे. हे समजणारी घटना आज समोर आली आहे. ब्रिटीश संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बचाव करताना यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बीबीसी डॉक्युमेंटरीमध्ये दाखवण्यात आलेल्या माहितीशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले. गुजरात दंगलीवेळी त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी डॉक्युमेंटरी बीबीसीने प्रसारित केली होती.

Rishi Sunak | PM Modi
शिंदे व फडणवीस ही जोडी तुमचे सर्व स्वप्न साकार करतील, शिंदे-फडणवीसांचे कौतुक करत मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

बीबीसीने डॉक्युमेंटरी प्रसारित केल्यानतंर यावरुन प्रचंड वाद निर्माण झाला. हा विषय ब्रिटनच्या संसदेतही उपस्थित करण्यात आला. बीबीसीच्या अहवालावर पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसैन यांनी प्रश्न उपस्थित केले. पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसैन यांनी प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नाला उत्तर देताना ऋषी सुनक म्हणाले की, याबाबत ब्रिटन सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही. ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्या विरोधात आम्ही नेहमीच भूमिका घेतली आहे. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधित या डॉक्युमेंटरीमध्ये मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत त्याच्याशी मी त्यांच्याशी अजिबात सहमत नाही. अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.

परराष्ट्र मंत्रालयानेही बीबीसीच्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करत ही पूर्णपणे पक्षपाती प्रत असल्याचे म्हटले आहे. नवी दिल्लीत एका साप्ताहिक ब्रीफिंगला संबोधित करताना, MEA प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, "आम्हाला वाटते की हा एक प्रोपगंडा आहे. यात कोणतीही वस्तुनिष्ठता नाही. हे पक्षपाती आहे. लक्षात घ्या की हे भारतात प्रदर्शित झाले नाही. आम्हाला नको आहे. यावर अधिक उत्तरे द्यावीत जेणेकरून याला जास्त प्रतिष्ठा मिळू नये." त्यांनी "अभ्यासाचा उद्देश आणि त्यामागील अजेंडा" यावरही प्रश्न उपस्थित केले.

काय नेमकं प्रकरण?

2002 मध्ये देशात गुजरात येथे मोठी दंगल घडली. परंतु, ही दंगल घडली तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे होते. त्यामुळे त्यांच्यावर त्यावेळी प्रचंड टीका झाली. त्यातच BBC ने देखील नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी "India: The Modi Question" ही दोन भागांची मालिका प्रसारित केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com