पंढरपुरातील विश्रामगृहातील चौकीदाराला संतोष बांगरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

पंढरपुरातील विश्रामगृहातील चौकीदाराला संतोष बांगरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे, वादग्रस्त कृतीमुळे कायम चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

अभिराज उबळे | पंढरपूर : शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे, वादग्रस्त कृतीमुळे कायम चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. परंतु, येथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाणीचा प्रकार केल्याचे समोर येत आहे. पंढरपूर येथील शासकीय विश्राम गृहावर चौकीदार म्हणून काम करणाऱ्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण व शिवीगाळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पंढरपुरातील विश्रामगृहातील चौकीदाराला संतोष बांगरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
राज्यपालांना हटवा अन्यथा जोडे कसे मारतात हे शिवसेना दाखवून देईल; राऊतांचा इशारा

हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहावर काल रात्री शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचे काही कार्यकर्ते आले होते. यावेळी त्यांनी रूमबाबत चौकीदार सौरभ कदम यांना विचारणा केली असता त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधा, असे सांगितले. या कारणावरून बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी सौरभ कदम या तरुणाला अर्वाच्छ भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली आहे. यामुळे आता पुन्हा संतोष बांगर वादात सापडण्याची शक्यता आहे.

पंढरपुरातील विश्रामगृहातील चौकीदाराला संतोष बांगरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य! निलेश राणेंचा इशारा; ...तर महाराष्ट्र सहन करणार नाही

दरम्यान, याआधी संतोष बांगर यांनीही मंत्रालयाच्या गेटवरील पोलिसांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होती. तर, मंत्रालयाच्या गेटवरील पोलिसांना शिवीगाळ केली होती. तसेच, पिकवीमा कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. अधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे चिडलेल्या बांगर यांनी पिकवीमा कार्यालयात तोडफोड केली होती.

पंढरपुरातील विश्रामगृहातील चौकीदाराला संतोष बांगरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
शेतकऱ्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात विरोधकांनी फोडले फटाके; राहुल गांधी संतापले
Lokshahi Marathi
www.lokshahi.com