पंकजा मुंडेंची श्री घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन 'शिव-शक्ती' परिक्रम यात्रा सुरू

पंकजा मुंडेंची श्री घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन 'शिव-शक्ती' परिक्रम यात्रा सुरू

श्रावण महिन्याचे औचित्य साधून शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्याचा दौरा सुरू केलाय.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अनिल साबळे, छत्रपती संभाजीनगर

श्रावण महिन्याचे औचित्य साधून शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्याचा दौरा सुरू केलाय. आज सकाळी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर पासून या दर्शन दौऱ्याला सुरवात झाली. ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचे घेणार दर्शन; १२ जिल्हयात जाणार - कार्यकर्त्यांच्याही गाठीभेटी घेणार आहे प्रवासा दरम्यान गांवोगावी त्याचे जंगी स्वागत करण्यात येत आहे.

समारोप ११ तारखेला परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्री होणार आहे. राज्यातील जवळपास बारा जिल्हे आणि चार हजार किमीचा त्या प्रवास करणार आहेत. प्रवासा दरम्यान ठिक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी देखील त्या घेणार आहेत. या परिक्रमेचा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून गावोगावी त्यांच्या जंगी स्वागताची तयारी होत आहे.

पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुकामातेचे दर्शन घेतले. या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद पहायला मिळाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com