निवडणुकीत मी पडले तर काय झाले? पंकजांनी  वाचला अन्यायाचा पाढा

निवडणुकीत मी पडले तर काय झाले? पंकजांनी वाचला अन्यायाचा पाढा

भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी सावरगावच्या दसरा मेळाव्यात मनातली खदखद बोलून दाखवली.

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी सावरगावच्या दसरा मेळाव्यात मनातली खदखद बोलून दाखवली. पंकजांनी आपल्या भाषणात स्वतःवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. स्वार्थी राजकारणासाठी निष्ठा विकणार नाही. माझी निष्ठा एवढी लेचीपेची नाही. पण माझा आवाजही कुणी दाबू शकत नाही, असे पंकजा मुंडेंनी म्हंटले आहे.

निवडणुकीत मी पडले तर काय झाले? पंकजांनी  वाचला अन्यायाचा पाढा
माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही : पंकजा मुंडे

कोणी म्हणत ताई या पक्षात चालल्यात, कोणी म्हणतात त्या पक्षात चालल्यात, कोणी म्हणता आम्हाला असं कळलं तसं कळलं. पंकजा मुंडे एवढी लेचीपेची नाही. पद नसताना निष्ठा काय असते या लोकांना विचारा, असे पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहे.

निवडणुकीत मी पडले तर काय झाले? आता राजकारणात पडतातच ना लोक. कधीतरी माझा पाय मोडला तर मला कुबड्या घेऊन चालावा. मग या कुबड्या एक तर पार्टी देऊ शकते नाहीतर जनता देऊ शकते. माझ्या जनेतेने मला एवढ्या कुबड्या दिल्या की दोन महिन्यात मॅरेथॉन पळायची ताकद माझ्यात आली आहे. आता आपल्याला त्रास देणारचं घर उन्हात बांधू. आता माझी माणसं संयम दाखवणार नाहीत. माझी माणसे भगवान शिवाची रूप आहेत शिवशंकर भोळा आहे पण त्याला सुद्धा तिसरा डोळा आहे, असा इशारा पंकजा मुंडेंनी दिला आहे.

बाप कर्जबाजारी झाला तर गळफास घेऊन आत्महत्या करतो. पण आईला किती छळ झाला तरी सहन करावा लागतो. इकडची सीट लढा, तिकडची सीट लढा, प्रीतम ताई गरीब असतील असं काही चालणार नाही. मी कोणाच्याही मेहनतीचा खाणार नाही. एकीकडं प्रीतम मुंडेंना घरी बसवून निवडणूक लढणार नाही. एक वेळ मी मेहनत करेन तुम्ही म्हणाले तर ऊस तोडायला जाईल पण स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

शिवशक्ती परिक्रमेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणाही त्यांनी केली. पहिल्या टप्प्यात जिथं जाता आलं नाही तिथं जाणार. मी थकणार नाही मी कधी कोणासमोर कधी झुकणार नाही. मी घेतला वसा कधीही टाकणार नाही, असे पंकजा मुंडेंनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com