माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही : पंकजा मुंडे

माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही : पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावर पार पडत आहे. या मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावर पार पडत आहे. या मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. या मेळाव्याला संबोधित करताना पंकजा मुंडे यांच्या माईकचा आवाज बंद झाला. यानंतर माझा आवाज कोणीही दाबू शकणार नाही, असा टोला पंकजा मुंडे यांनी लगावला.

माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही : पंकजा मुंडे
पंकजा मुंडेंच्या सभेत 'सीएम सीएम'च्या घोषणा

शिवशक्ती परिक्रमा जेव्हा काढली तेव्हा मला वाटलं नव्हतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढे भव्य स्वागत होईल. मुंडे साहेब नेहमी म्हणायचे मी माझ्या कातड्याचे जोडे जरी केले तरी तुमचे उपकार कधीच भेटू शकणार नाही. माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा दोन दिवसात 11 कोटी रुपयांची चेक तुम्ही जमा केले. पण माझ्याकडे तुम्हाला बसायला द्यायला साधी सतरंजी सुद्धा नाही. तुम्हाला मला काही खाऊ घालता येत नाही. तुम्ही उन्हात आहात म्हणून आम्ही देखील उन्हात थांबलो आहोत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

याचदरम्यान पंकजा मुंडे यांच्या भाषणात माईकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. मुख्य डायस सोडून हातात माईक घेऊन पंकजा मुंडे यांनी भाषण सुरू केले. माझ्या मेळाव्यात कोण घुसला, कोणी वायर बंद केलं. कोणी माझी वायर कापली, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. पण माझा आवाज कुणीही दाबू शकणार नाही, असेही पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहे. याबरोबरच निवडणुकीत जिंकण्यासाठी निष्ठा, नितीमत्ता गहाण ठेऊ शकत नसल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

लोकांनी जेव्हा अकरा कोटी रुपये जमा केले. तेव्हा माझ्या मुलाने विचारले, मम्मी तू हे पैसे घेणार आहेस का? मी म्हटलं मी पैसे घेणार नाही. पण, त्या एवढ्या लोकांच्या आशीर्वाद मात्र मी घेतल्याशिवाय राहणार नाही. भगवान बाबाचे साक्षीने मी तुम्हाला सांगते मी माझ्या मुलाला ते त्यादिवशी एक वाक्य बोलले की बेटा तुझ्या आधी हे लोक माझ्यासाठी आहेत. जेवढे तू माझी जबाबदारी आहे तेवढीच जास्त या लोकांची जबाबदारी माझ्यावर आहे, असे भावनिक साद पंकजा मुंडे यांनी घातली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com