दोन महिन्यांच्या 'ब्रेक'नंतर पंकजा मुंडेंचा अकरा दिवसांचा दर्शन दौरा

दोन महिन्यांच्या 'ब्रेक'नंतर पंकजा मुंडेंचा अकरा दिवसांचा दर्शन दौरा

दोन महिन्यापासून पंकजा मुंडे सुट्टीवर होत्या.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दोन महिन्यापासून पंकजा मुंडे सुट्टीवर होत्या. या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या दहापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये दौरा करणार आहेत. हा दौरा केवळ देवदर्शनासाठी असेल असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे.

या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनापासून करण्यात येणार आहे. आता दोन महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचे पाहायला मिळाले आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या दहापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये देवदर्शन दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com