Pankaja Munde : राज्यसभेच्या उमेदवारी बाबत पंकजा मुंडे म्हणाल्या...

Pankaja Munde : राज्यसभेच्या उमेदवारी बाबत पंकजा मुंडे म्हणाल्या...

पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात गाव चलो अभियान राबविले जात आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात गाव चलो अभियान राबविले जात आहे. या अभियानादरम्यान पौंडूळ गावात पंकजा मुंडेंनी रात्रीचा मुक्काम केला. मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत केलं.

यावेळी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोकांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्त्वाचा विषय आहे. त्यांना जिथे पाहिजे तिथे मी दिसली तर फार मोठी गोष्ट आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत माझं नाव चर्चेत होतं. यात नाविन्य असं काही नाही. असे त्या म्हणाल्या.

यासोबतच त्यांच्या तब्येतीविषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ब्रीच कँडी रुग्णालयात एमआरआय केला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फिजिओथेरपी झाली आहे. तीन आठवड्यानंतर प्रकृती ठीक झाली नाही तर मात्र सर्जरी करावी लागेल. लोकांमध्ये आल्यावर मी कधीच माझं दुःख दाखवून देत नाही. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com