Pankaja Munde : राजकारण बदललं, आता सकाळी कुणी कुठे, तर दुपारी कुठं असतं
श्रावण महिन्याचे औचित्य साधून शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्याचा दौरा सुरू केलाय. याच पार्श्वभूमीवर कोपरगावमधून आज पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, माझ्या मेळाव्याला ना भजन आहे ना भोजन आहे. तरीही तुम्ही सर्वजण येता. लोकांनी मला आज विचारले की, तुमच्या या कार्यक्रमाचे मिशन काय तर मी त्यांना सांगितले आमच्याकडे मिशनही नाही आणि कमिशनही नाही. यालाच म्हणतात मुंडेंची परिक्रमा. मी मंत्री नाही की मी मोठ्या पदावर नाही तरीही लोक मेळाव्याला येतात.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की,मी कधीच कुणासमोर झुकले नाही. राजकारण वेगळं झालंय. सकाळी कुणी कुठे असते तर दुपारी, संध्याकाळी कुणी कुठे असते. डोकं पागल व्हायची वेळ आली. अशावेळी काय करावं तर दोन महिने सुट्टी घ्यावी. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी कुणासमोर झुकत नाही. राजकारण हे व्रत आहे आणि या व्रतामध्ये काट्यावर चालणाऱ्यांचीच कदर होते आणि गालिचांवर चालणाऱ्यांची कदर होत नसते. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.