पियूष गोयल मुंबईतून लोकसभा लढवण्याची शक्यता

पियूष गोयल मुंबईतून लोकसभा लढवण्याची शक्यता

पियूष गोयल मुंबईतून लोकसभा लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पियूष गोयल मुंबईतून लोकसभा लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपच्या पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई, तर गोपाळ शेट्टी हे उत्तर मुंबई मतदारसंघाचे खासदार आहेत. गोयल यांच्याकडे वाणिज्य, वस्त्रोद्योग, ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत.

राज्यसभेतील भाजपचे मंत्री असलेले व नसलेले पण ज्येष्ठ खासदार आहेत अशांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी पक्षाने केली असल्याची माहिती मिळत आहे.

भाजपच्या पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई, तर गोपाळ शेट्टी हे उत्तर मुंबई मतदारसंघाचे खासदार आहेत. या दोनपैकी एका मतदारसंघात गोयल यांना मैदानात उतरवले जाईल असे म्हटले जात आहे. त्यांच्यासाठी नेमका कोणता मतदारसंघ योग्य ठरेल याची चाचपणी केली जात असल्याचे समजते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com