'मन की बात' प्रसादाच्या थाळीसारखी; 100 व्या भागामध्ये पंतप्रधान मोदींनी साधला जनतेशी संवाद

'मन की बात' प्रसादाच्या थाळीसारखी; 100 व्या भागामध्ये पंतप्रधान मोदींनी साधला जनतेशी संवाद

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा आजचा 100 वा भाग होता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा आजचा 100 वा भाग होता. यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी 100 व्या पर्वाबाबत हजारो पत्रे आणि संदेश आले आहेत. ही पत्रे वाचून माझे मन भावूक झाले, असे म्हंटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या पहिल्या भागाची आठवण केली. ते म्हणाले, 3 ऑक्टोबर 2014 हा दसरा हा सण होता. या दिवसापासून 'मन की बात'चा प्रवास सुरू केला. दसरा म्हणजेच वाईटावर चांगल्याच्या विजय. 'मन की बात' हा देखील देशवासियांच्या चांगल्या सकारात्मकतेचा अनोखा सण बनला आहे. प्रत्येक एपिसोड स्वतःच खास होता. माझ्यासाठी 'मन की बात' म्हणजे देवासारख्या जनतेच्या चरणी प्रसादाचे ताट आहे. 'मन की बात' हा माझ्या मनाचा आध्यात्मिक प्रवास झाला आहे. 'मन की बात' हा स्वत:पासून समाजापर्यंतचा प्रवास आहे. 'मन की बात' हा अहंकार ते स्वत्वाचा प्रवास आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

मन की बातच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरू झाल्या. खेळणी उद्योगाची पुनर्स्थापना करण्याचे मिशन मन की बातनेच सुरू झाले. आपल्या भारतीय कुत्र्याबद्दल म्हणजेच देसी कुत्र्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची सुरुवातही मन की बातने झाली. असे प्रत्येक प्रयत्न समाजात परिवर्तनाचे कारण बनले आहेत.

आज देशात पर्यटन खूप वेगाने वाढत आहे. आपली नैसर्गिक संसाधने असोत, नद्या, पर्वत, तलाव किंवा आपली तीर्थक्षेत्रे असोत, त्यांची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पर्यटन उद्योगाला मोठी मदत होणार आहे. मी नेहमी म्हणतो की परदेशात जाण्यापूर्वी आपण आपल्या देशातील किमान 15 पर्यटन स्थळांना भेट दिली पाहिजे. हे ठिकाण तुम्ही ज्या राज्यात राहता त्या राज्यातील नसावे. तुमच्या राज्याबाहेरील इतर कोणत्याही राज्यातील असणे आवश्यक आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com