महाराष्ट्राला मोठा प्रोजेक्ट देण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन; सामंतांची माहिती

महाराष्ट्राला मोठा प्रोजेक्ट देण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन; सामंतांची माहिती

वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर उदय सामंत यांनी दिली माहिती

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्याची घोषणा केली आहे. यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. विरोधकांनी शिंदे सरकारची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. अशात उदयोगमंत्री उदय सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती दिली आहे. यात महाराष्ट्राला अजून मोठा प्रोजेक्ट देणार असल्याचे आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे सामंतांनी सांगितले.

उदय सामंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून बोलणे झाले आहे. गेल्या आठ महिन्यात महाराष्ट्रातून हवा तो रिस्पॉन्स न मिळाल्याने वेदांताचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेला असल्याची पंतप्रधाननी सांगितले. परंतु, महाराष्ट्राला अजून मोठा प्रोजेक्ट देणार असल्याचे आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी दिले, असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

एका बाजूला वेदांत प्रोजेक्ट गेला. म्हणून बोबाबोंब केली जात आहे. पण, कोकणच्या रिफायनरीवर काही बोलत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

दरम्यान, दरम्यान, वेदांतने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीशी भागीदारी केली असून, या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. यात एक लाख ६३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होती. पश्चिम महाराष्ट्रात तळेगाव तर विदर्भात बुटीबोरीच्या जागेचा पर्याय देण्यात आला. या प्रकल्पांमधून सुमारे २ लाख जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळणार असल्याची प्राथमिक अंदाज होता. मात्र, मंगळवारी वेदांत समूहाने आपला प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या प्रकल्पासाठी गुजरात सरकारने १ हजार एकर जमीन विनाशुल्क दिली आहे. तसेच वीज व पाणी सवलतीच्या दरात आणि तेही २० वर्षांसाठी एकाच दराने देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Lokshahi
www.lokshahi.com