PM Narendra Modi :  हे अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचं असेल

PM Narendra Modi : हे अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचं असेल

संसदेचं विशेष अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाला संबोधित केलं.
Published on

संसदेचं विशेष अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाला संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, मून मिशनचे यश चांद्रयान-3, आपला तिरंगा फडकवत आहे. शिवशक्ती पॉईंट नवीन प्रेरणा केंद्र बनलं आहे. या पॉईंटमुळे आपला ऊर अभिमानाने भरला आहे. भारत ग्लोबल साऊथचा आवाज बनला आहे. देशात उत्साहाचा वातावरण आहे. संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी भलेही छोटा असेल. पण काळाच्या हिशोबाने अधिक मोठा आहे.

भारताला 2047 पर्यंत आपल्याला विकसित राष्ट्र करायचं आहे. भारताच्या प्रयत्नामुळे आफ्रिकन संघ जी-20चा स्थायी सदस्य बनला. भारताला या गोष्टीचा नेहमीच अभिमान राहील. सर्व वाईट गोष्टी सोडून आपण चांगल्या गोष्टी घेऊन नव्या संसदेत जाऊया. संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी छोटा असला तरी या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतला जाणार आहे. असे नरेंद्र मोदी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com