...यामुळे शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही; मोदींचं वक्तव्य
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मंगळवारी संध्याकाळी एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केल्याचे समजते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केलं.
तसेच महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नाही. शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती त्यावेळी सामना वृत्तपत्रातूत माझ्यावर टीका करण्यात आली. काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही. असे पंतप्रधान मोदी म्हणाल्याची माहिती मिळत आहे.
या बैठकीला पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन मेघवाल आणि जे पी नड्डा उपस्थित होते. अजित पवार गटाचे खासदारही बैठकीसाठी हजर होते.