माफी माग नाही तर तुला सोडणार नाही; पोलीस पत्नीचा नवनीत राणांना इशारा

माफी माग नाही तर तुला सोडणार नाही; पोलीस पत्नीचा नवनीत राणांना इशारा

नवनीत राणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची पोलीस कुटुंबियांची मागणी

सूरज दहाट | अमरावती : शहरातील राजापेठ पोलीस ठाण्या अंतर्गत एका १९ वर्षीय युवतीचं बेपत्ता झाल्याने याप्रकरणाचा संबंध अपहरण व लव्ह जिहादशी खासदार नवनीत राणा यांनी जोडला होता. परंतु, आता हे प्रकरण नवनीत राणा यांच्याच अंगलट येताना दिसत आहे. पीडित तरुणीने शुक्रवारीच राणांविरोधात खुलासा केला. अशातच आज पोलीस पत्नीने सर्वांची माफी माग नाही तर तुला सोडणार नाही, असा थेट इशाराच नवनीत राणा यांना दिला आहे.

अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात लव्ह जिहाद झाल्याचा आरोप करत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली होती. व पोलिसांशी जोरदार बाचाबाची करून राणांनी मोठा राडा घातला होता. त्यानंतर अमरावतीत पोलीस कुटुंब चांगलेच आक्रमक झाले आहे. शिवसेना पदाधिकारी व पोलीस पत्नी वर्षा भोयर यांचे वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. यात त्यांनी नवनीत राणा यांना सणसणीत इशारा देत माफी मागण्याचे आव्हान केले आहे,

नवनीत राणा तुला शेवटची संधी देते. तुला खरच माणुसकी असेल ना तर सर्व पोलिसांची जाहीरपणे माफी माग. नाही तर तुला आता मी सोडणार नाही. तू पोलिसांच्या काळजाला हात घातलेला आहे. रात्रभर कोरोना काळामध्ये पोलिसांनी कर्तव्य पार पाडलं. तुला पोलिसांचे दुःख नाही कळणार. पोलिसांबद्दल अपशब्द तू नेहमीच वापरते, असा इशाराच पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी दिला आहे. यामुळे हे प्रकरण आता तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

काय आहे प्रकरण?

अमरावती येथे कथित लव्ह जिहाद प्रकरणी बेपत्ता तरुणी बेपत्ता होती. ती अखेर चार दिवसांनंतर अमरावतीत पोहोचली. संबंधित युवतीला डांबून ठेवल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्याचबरोबर त्यांनी अमरावती येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोंधळ घातला होता. मात्र, तरुणीने मला कोणीही पळवुन नेलं नाही. मी बाहेर शिक्षणासाठी जात होते. नवनीत राणा बोलत आहे ते पूर्ण खोट आहे, असा धक्कादायक खुलासा पीडित तरुणीने माध्यमांशी बोलतांना केला. त्यामुळे विविध आरोप करणारे भाजप नेते व राणा दाम्पत्य या प्रकरणात तोंडघशी पडले आहे.

Lokshahi
www.lokshahi.com