पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे मागितली आत्महत्येसाठी परवानगी; कारण काय?

पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे मागितली आत्महत्येसाठी परवानगी; कारण काय?

पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे मागितली आत्महत्येसाठी परवनगी
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून नवऱ्याचा होत असलेला मानसिक छळ पहावत नसल्याने पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येसाठी परवनगी मागितल्याची माहिती आहे. मुंबईच्या गोराई पोलिस ठाण्यातील हा प्रकार आहे.

गोराई पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस शिपाई योगेश खेडेकरच्या पत्नी मिनाक्षी खेडेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्येसाठी परवानगी मागितली आहे गोराई पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी नवऱ्याच्या खोटया तक्रारी व रिपोर्ट बनवून नवऱ्याला अडचणीत आणत असून मानसिक छळ करत असल्याचे पोलिस पत्नीने तक्रारीत म्हटले आहे.

वरिष्ठ पोलिसांकडे दाद मागून, पुरावे देऊनही त्या अधिकाऱ्याला पाठिशी घातले जात असल्याचा मिनाक्षी खेडेकर यांचा आरोप रोजच्या मानसिक त्रासाला कंटाळूनच मिनाक्षी खेडेकर यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना उद्देशून ट्विट करत आत्महत्येची परवानगी मागितली आहे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com