Uddhav Thackeray : मुंब्य्रात उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडले

Uddhav Thackeray : मुंब्य्रात उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडले

मुंब्य्रातील शिवसेना शाखेच्या वादानंतर आता उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडल्याने मोठ्या संघर्षाची शक्यता आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंब्य्रातील शिवसेना शाखेच्या वादानंतर आता उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडल्याने मोठ्या संघर्षाची शक्यता आहे. मुंब्य्रातील रस्त्यावर लावलेले उद्धव ठाकरेंचे पोस्टर अज्ञाताने फाडले आहेत. याआधी शाखेवरून शिवसेना-ठाकरे गटात राडा झाला होता.

मुंब्र्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढत शिंदे गटाने ही शाखा जेसीबीने जमीनदोस्त केल्याने गोंधळ उडाला होता. या शाखेच्या पाडकामावरून ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाला. संबंधित शाखेसह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे मुंब्र्यात येणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com