उद्धव ठाकरे आमचे वकील; आंबेडकरांचे विधान, त्यांनी...
पुणे : देशाच्या राजकीय विरोधी पक्षांनी स्थापित केलेल्या इंडियाच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नसल्याचं वंचित बहुजनने स्पष्ट केलं आहे. मात्र, अनेक माध्यमांद्वारे वंचित या बैठकीकडे पाठ फिरवणार असल्याच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहे. यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे वकील उद्धव ठाकरे आहेत त्यांनी भूमिका या बैठकीत मांडली पाहिजे, असे आंबेडकर यांनी म्हंटले आहे.
आम्ही शिवसेना बरोबर आहोत. आता आम्हाला निमंत्रण दिलं का नाही हे काँग्रेसला विचारा. २०१९ मध्ये काँग्रेसला ऑफर दिली होती. काँग्रेस आमंत्रण देत नाही म्हणून ते आमच्या आघाडीत नाहीत. आमचे वकील उद्धव ठाकरे आहेत त्यांनी भूमिका या बैठकीत मांडली पाहिजे. शिवसेना आमच्या बाजूने बॅटिंग करेल अशी अपेक्षा आहे. मी महा विकास आघाडीमध्ये नाही आम्हाला इंडियाचे आमंत्रण नाही, असे प्रकाश स्पष्ट आंबेडकर यांनी केले आहे.
तर, सभांमध्ये अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुकावरही प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले आहे. अजित पवार मोदी यांचे कौतुक करणारच कारण आता ईडी आहे ना त्यांच्यावर, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.