राजकारण
Prakash Ambedkar : आम्ही 'इंडिया'मध्ये जाण्यासाठी इच्छुक पण...
लोकशाही मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे.
लोकशाही मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर देखिल प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आले की, इंडिया आघाडीच्या बैठकीचे आमंत्रण तुम्हाला आले होते का? त्या तुम्ही हवे होता. अशी अनेकांची इच्छा होती असे का झाले नाही? यावर उत्तर देत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ते तुम्ही सोनिया गांधींना विचारा. मला आमंत्रण अजिबात नव्हते. आम्ही 'इंडिया'मध्ये जाण्यासाठी इच्छुक आहोत. गेले पाहिजे मात्र बिन बुलाये मेहमान म्हणून आम्ही जाणार नाही. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.