काँग्रेसने युती केली तर वाचतील नाही तर...; आंबेडकरांचा महाविकास आघाडीला सल्ला

काँग्रेसने युती केली तर वाचतील नाही तर...; आंबेडकरांचा महाविकास आघाडीला सल्ला

अमरावती येथील लोकशाही गौरव महासभेत प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेसला सल्ला दिला आहे.

अमरावती : काँग्रेसने युती केली तर वाचतील आणि युती नाही केली तर, जेलमध्ये जातील. काँग्रेस-राष्ट्रवादी-उध्दव ठाकरे यांची शिवसेना यांनी बसून समझोता करावा. समझोता नाही झाला तर, तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. ते अमरावती येथील लोकशाही गौरव महासभेत बोलत होते.

काँग्रेसने युती केली तर वाचतील नाही तर...; आंबेडकरांचा महाविकास आघाडीला सल्ला
कारसेवकांच्या वादावर फडणवीसांकडून ठाकरे गटाला प्रत्युत्तर; 'तो' फोटो ट्विट

दोन वर्ष ओलांडली तरीही, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यात समझोता झाला नाही. अजूनही लोकसभेच्या 48 जागा यांना वाटता आल्या नाहीत. मला राहून राहून शंका येते की, यांना खरचं मोदी आणि भाजपला हरवायचं आहे का? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी यावेळी उपस्थित केला. आम्ही कुरबानीचा बकरा नाही. तुम्ही तुमच्या जागा वाटून घ्या. आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या आम्ही ज्यांच्याकडे गेल्यात त्यांच्यासोबत वाटाघाटी करू घेऊ आणि नाही जमलं तर 48 च्या 48 जागा आम्ही लढवायला तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

वंचित बहुजन आघडीपैकी जेलमध्ये एकही जाणार नाही मात्र, जेलमध्ये सोनिया गांधींपासून इतर सगळे जातील. मोदी वाघ म्हटल तरी खात आहे आणि वाघोबा म्हटल तरी खात आहे. मग, दोन हात करायला कशासाठी भीत आहात? असा प्रश्न आंबेडकरांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला विचारला आहे.

भाजपला हरवयाची काँग्रेसची इच्छा आहे का? चार जागा कमी मिळाल्या किंवा चार जागा जास्त मिळाल्या तर फरक काय आहे? तुमच्या मानगुटीवर कारवाईची तलवार आहे. एकत्र लढलात तर ती तलवार उडवू शकता. पण, भीत भीत लढलात तर ती तलवार तुमच्या मानगुटीवर पडल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

तुम्ही आम्हाला जर चर्चेत घेतलं तर, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही जसं इथल्या गरीब मराठ्याला वापरत आलात त्याच पद्धतीने जर वंचितला वापरायचा विचार केला तर, मोदी सोबत आम्ही तुम्हालाही गाडू एवढं लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी काँग्रेस आणि इतर प्रस्तापित पक्षांना दिला आहे.

भारत जोडो यात्रा कधी सुरू झाली आणि कधी संपणार आहे? ती या महिन्यात संपणार आहे की, मार्च मध्ये संपणार आहे? असे म्हणत या भारत जोडो यात्रेला नरेंद्र मोदी पावनखिंडीत अडवल्याशिवाय राहणार नाही.

निवडणुका तोंडावर आले असताना त्याला तोंड देण्याच्या ऐवजी काँग्रेसवाले भारत जोडो न्याय यात्रा काढत आहेत त्या भारत यात्रेमधून आरएसएस बीजेपीवाले हरणार असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे त्यांनी नमूद केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com