Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Team Lokshahi

प्रकाश आंबेडकरांनी सांगितला भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; म्हणाले, फडणवीसांना आवडणार नाही...

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतही कायम राहणार आहे. या युतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असतील का? याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील.

सध्या राज्यात प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच विधानपरिषद निवडणुकीवरून प्रचंड वातावरण तापले आहे. त्यातच नाशिक पदवीधर निवडणुकीवर जोरदार गदारोळ सुरु असताना, त्यावरच बोलत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आबंडेकर यांनी मोठा दावा केला आहे. औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे विधान केले आहे.

Prakash Ambedkar
स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला तसे वचन दिलं; का म्हणाले सोमय्या असे?

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत बोलत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत भाजपाची वेगळी खेळी सूरू आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्याच्या प्रयत्नात भाजपा आहे. मी जे बोलतो आहे, ते देवेंद्र फडणवीसांना आवडणार नाही, पण राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

पुढे बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गट युतीबाबत देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले की, आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आम्ही सोबत लढणार आहोत. त्यासाठी जागा वाटपही निश्चित झाले आहे. तसेच आमची युती २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतही कायम राहणार आहे. या युतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असतील का? याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील. असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com