सकाळच्या बोलक्या पोपटाने निकाल सुट्टीवर गेलेल्या पक्षप्रमुखांना कळवावे; कुणी केली टीका?

सकाळच्या बोलक्या पोपटाने निकाल सुट्टीवर गेलेल्या पक्षप्रमुखांना कळवावे; कुणी केली टीका?

ग्रामपंचायतींच्या निकालात महायुतीची सरशी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. ग्रामपंचायतींच्या निकालात महायुतीची सरशी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले आहे. सकाळच्या बोलक्या पोपटाने ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सुट्टीवर गेलेल्या त्यांच्या पक्ष प्रमुखांना कळवावे, असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आहे.

सकाळच्या बोलक्या पोपटाने निकाल सुट्टीवर गेलेल्या पक्षप्रमुखांना कळवावे; कुणी केली टीका?
मुक्ताईनगरात एकनाथ खडसेंना धक्का; शिंदे गटाची मुसंडी

प्रसाद लाड म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीवर विश्वास दाखवला आहे. तर, महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवली आहे, याकरिता महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो. आतापर्यंतच्या निकालात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत, याचा आम्हाला आनंद आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांना सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या आसपास जाण्याची कुवत काँग्रेसची तर सोडाच पण महाविकास आघाडीची पण बनलेली नाहीये, असा घणाघात प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. सकाळच्या बोलक्या पोपटाने ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सुट्टीवर गेलेल्या त्यांच्या पक्ष प्रमुखांना कळवावे, असा निशाणाही त्यांनी साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com