मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतील; मंत्रिमंडळाबाबत शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक विधान

मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतील; मंत्रिमंडळाबाबत शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक विधान

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमदार प्रताप सरनाईक यांचे सूचक वक्तव्य

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचं लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार यावरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. तर, अनेक इच्छुकांनी आपली मंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अशात, शिंदे गटातील नेते प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतील, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतील; मंत्रिमंडळाबाबत शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक विधान
काश्मीरला जाऊनही त्यांना अजित पवार आणि सुप्रिया सुळेच दिसतात; मुख्यमंत्र्यांवर निशाणा

काय म्हणाले प्रताप सरनाईक?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काहीही झालं तरी एखाद्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे मला दिलेला शब्द ते नक्कीच पाळतील, असे वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. राज्यातील युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नक्कीच लांबलेला आहे. मात्र, सध्याच्या मंत्रिमंडळाला सोबत घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे राज्याचा कारभार योग्य रितीने करत आहेत. मात्र, लवकरच ते दिलेला शब्द पाळून मंत्रिमंडळ विस्तार करतील याबाबत आमच्या मनात काळजीचे कारण नसल्याचं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com