संजय राऊतांनी नाक घासून महामोर्चात माफी मागावी : प्रवीण दरेकर

संजय राऊतांनी नाक घासून महामोर्चात माफी मागावी : प्रवीण दरेकर

राऊतांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा उल्लेख चुकीचा केल्याने भाजप आता आक्रमक झाली आहे. यावरुन प्रवीण दरेकर यांनीही निशाणा साधला आहे.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी महापुरुषांविषयी केलेली वक्तव्ये तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून होणारी वक्तव्ये यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. परंतु, राऊतांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा उल्लेख चुकीचा केल्याने भाजप आता आक्रमक झाली आहे. यावरुन चित्रा वाघ यांच्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले की, संजय राऊत हे लोका सांगे ब्रह्मज्ञान व स्वतः कोरडे पाषाण हे समोर आले आहे. स्वतः विश्वव्यापी संपादक समजणारे, किती खप आहे माहिती नाही. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो. संजय राऊतांनी नाक घासून महामोर्चात माफी मागितली पाहिजे. कुठल्या तोंडाने मोर्चा काढत आहात, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. यावरुनही प्रवीण दरेकर यांनी उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपला तो बाब्या, दुसऱ्यांचे ते कार्ट असे सुरु आहे. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यानंतर आक्रमक होतात. मात्र, स्वतः मोठी चूक करून मखलाशी करत असतील, तर त्याला उत्तर देऊ. ज्ञान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्या बाबासाहेबांच्या जन्मस्थळाबाबत माहिती नसेल तर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

लोकशाहीमध्ये असे घडु नये. पण, असे घडतय. ज्या महाराष्ट्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. ज्याने लोकशाही जन्माला घातली. त्या महाराष्ट्रात जे घडतय. ते महाराष्ट्राचे दुर्देव आहे. महाराष्ट्रातील विषय फार गंभीर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारख्या दैवतांचा जो अपमान घटनाकत्मक पदावर बसलेला व्यक्ती खुलेआम करतात आणि त्याचं समर्थन सरकार करत आहे. याविरोधात मोर्चा काढू नये का?, असा सवाल राऊतांना विचारला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com