बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना; दरेकरांचा उध्दव ठाकरेंना टोला

बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना; दरेकरांचा उध्दव ठाकरेंना टोला

कर्नाटकातील निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांनी उध्दव ठाकरेंवर साधला निशाणा

मुंबई : कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयानंतर महाविकास आघाडीचा विश्वास वाढला आहे. निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे तसेच, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत संयुक्त सभांचा धडाका वाढवण्यावरही शिक्कामोर्तब झाले. यावरुन भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना; दरेकरांचा उध्दव ठाकरेंना टोला
फक्त तीन हजार रुपयांसाठी आयटी इंजिनियरची हत्या; पोलिसांनी 24 तासात लावला छडा

बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना असे सुरू आहे. तुमचे कर्तृत्व काय आहे? तुम्ही तिकडे जाऊन काय दिवे लावलेत, असे प्रश्न प्रवीण दरेकर यांनी उध्दव ठाकरेंना विचारले आहे. तर, जनता दलाला जी मते मिळणार होती ती काँग्रेसला मिळाली. भाजपची मते कमी झाली नाहीत, असा दावाही त्यांनी केला आहे.

ईव्हीएममध्ये कोणताही घोटाळा नाही, हे लोकांना दाखवून देण्यासाठी भाजप राज्यांच्या निवडणुका विरोधकांना जिंकू देतात, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. या विधानावरुन प्रवीण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर पलटवार केला आहे. जितेंद्र आव्हाड बकवास आहे. अशा लोकांना मी उत्तर देत नाही, अशा शब्दात त्यांनी आव्हाडांवर टीका केली.

दरम्यान, मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषद नुकतीच पार पडली. यात गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी 'एक खिडकी' योजना राबविणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, वाढीव शुल्क दर रद्द करण्याचा आज निर्णय झाला. देवेंद्र फडणवीस यांनी एक खिडकी योजनेचा निर्णय घेतला होता. मात्र, अडीच वर्षात त्याचा जीआर देखील निघाला नाही. मात्र, सरकार बदलल्यानंतर येत्या तीन महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल, असे त्यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com