अजित पवारांच्या प्रवेशाने शिंदे गट नाराज? प्रवीण दरेकर म्हणाले...

अजित पवारांच्या प्रवेशाने शिंदे गट नाराज? प्रवीण दरेकर म्हणाले...

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांनी शपथ घेतल्याने शिंदे गटाचे नेते नाराज असल्याची चर्चा आहे.

संतोष आवारे | अहमदनगर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांनी शपथ घेतल्याने शिंदे गटाचे नेते नाराज असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. अजित दादांच्या प्रवेशाने कोणी नाराज नाही, आमची मंडळी नाराज नाही आणि मला वाटतं जे काय व्हायचंय ते दोन्ही पक्षाचा आब राखून, मान राखूनच होईल आणि तिन्ही पक्ष एकोप्याने राष्ट्रवादी, शिंदे आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या विकासासाठी आपली नाराजी व मान या पलीकडे जाऊन राज्यातल्या जनतेला स्थिर सरकार देऊन काम करण्याच्या भावनेतून एकत्र आलेत, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवारांच्या प्रवेशाने शिंदे गट नाराज? प्रवीण दरेकर म्हणाले...
आनंद परांजपेंची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी, अजित पवारांकडून पुन्हा नियुक्ती

शिंदे गटाचे आमदार हे जेव्हा गुवाहाटीला गेले होते त्याचवेळी राष्ट्रवादीचे 51 आमदार हे भाजपसोबत जाण्यासाठी तयार होते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. याबाबत प्रवीण दरेकर यांना विचारले असते ते म्हणले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांची प्रामुख्याने पहिल्यापासून तशी इच्छा होती. जर राज्याला स्थिर सरकार पाहिजे. भक्कम सरकार पाहिजे तर एकत्रितपणे महाराष्ट्राचे विकासासाठी काम करूया, अशी भूमिका पहिल्या दिवसापासूनच त्या ठिकाणी होती. याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही, असं दरेकर यांनी सांगितले. यावरून शिंदे गटाचे आमदार हे गुवाहाटीला असताना भाजप हे राष्ट्रवादीच्या संपर्कात होते या गोष्टीवर दरेकर यांनी एकप्रकारे शिक्कामोर्तबच केला आहे.

तर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत आल्यानं याचा फायदा नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला निश्चितच होईल. कारण आज देशांमध्ये पक्षापलीकडे जाऊन देशातील चांगले नेते आहेत आणि पक्ष हे देशाचे पंतप्रधान मोदीच व्हायला हवेत, अशी भूमिका घेत आहेत. त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नव्या महायुतीला शंभर टक्के यश मिळेल, अशा विश्वास भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com